
दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत व्यवहारात राहणार आहेत. या नोटा बँक शाखांत परत करण्याची आणि तुमच्याजवळील नोटा बदलून घेण्यासाठी 23 मेपासून सुरुवात झाली आहे.
काय कराल…
- आपल्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन जवळच्या बँकेत जा.
- बँकेत रिक्विझिशन स्लिप भरून द्यावी. आवश्यक ती माहिती भरावी.
- रिक्विझिशन स्लिप नोटांसह बँकेकडे द्यावी आणि नोटा बदलून घ्याव्यात.
- ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एका वेळी कमाल 20 हजार रुपयांपर्यंतच्याच नोटा बदलून दिल्या जाणार आहेत.
बँकांना सूचना
- ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना आरबीआयने अन्य बँकांना केली आहे.
- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिला यांना नोटा सुलभरीत्या जमा करता याव्यात यासाठी व्यवस्था करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.
- सर्व बँकांनी दोन हजाराच्या नोटा ग्राहकांना देणे तत्काळ थांबवावे.
- एटीएम व पॅश रिसायकलर्स यामध्ये दोन हजाराच्या नोटा मिळणे तत्काळ थांबवले जावे.


























































