‘निळवंडे’च्या कालव्यातून पाणीचाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर नगर जिह्याला वरदान ठरणाऱया निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज पाणीचाचणी करण्यात आली. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यांतील 182 गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीचाचणी करण्यात आली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे नेते मधुकर पिचड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे जवळपास 6 लाख 8 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जमीन सिंचनाखाली आल्यामुळे या भागातील शेतकऱयांना याचा लाभ होईल.

भिवंडीतील शेतकऱयाने हेलिकॉप्टर घेतले

माझ्यावर टीका केली जाते की, शेतकऱयाचा मुलगा हेलिकॉप्टरमधून फिरतो. शेतकऱयाच्या मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये काय? भिवंडीत एका शेतकऱयाने स्वतःचे हेलिकॉप्टर घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.