घरच्या घरी बनवा मिल्क पावडर..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूध हा आपल्या दररोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. सकाळच्या चहापासून रात्री झोपेपर्यंत आपण दुधाचा वापर करतो. हेच दूध जर पावडरच्या स्वरुपात ठेवलं, तर ते महिनाभर टिकू शकतं. बाजारात मिळणारी दूध पावडर ही बऱ्याच वेळा महाग असते. तसंच त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असल्याची भीतीही असते.

यासाठी आधी दूध उकळून घ्यावे. त्यानंतर हे दूध थंड होण्यासाठी ठेवा. दूध थंड होईपर्यंत मायक्रोवेव्ह ओव्हनला 150 डिग्री फॅरेनहाईट एवढ्या तापमानाला प्रीहीट करून घ्या. यानंतर कोमट झालेलं दूध ओव्हनमध्ये ठेवा. हे दूध मध्ये-मध्ये हलवत रहा. काही वेळानंतर हे दूध कोरडं होऊन अगदी घट्ट होईल. त्यानंतर या दुधाचे तुकडे मिक्सर-ग्राईंडरमध्ये टाकून त्याची पावडर बनवून घ्या.
जेवढी मिल्क पावडर बनवायची आहे, त्यापेक्षा अधिक दुधाची गरज भासणार आहे. म्हणजेच जर तुम्हाला अर्धा किलो दूध पावडर हवी असेल, तर सुमारे एक ते दीड किलो दूध त्यासाठी लागणार आहे.

अशी घ्या काळजी
दूध पावडर तयार झाल्यानंतर ती हवाबंद डब्यामध्ये ठेवा. अन्यथा ही पावडर लवकर खराब होऊ शकते. सुरक्षितपणे ठेवलेली मिल्क पावडर तुम्ही महिनाभर वापरू शकता. मिल्क पावडरचा वापर तुम्ही गुलाब जाम, केक, चहा अशा गोष्टींमध्ये करू शकता.

‘