
दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज 2 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण याची माहिती उपलब्ध होईल तसेच सदर माहितीची प्रिंट घेता येईल.
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाइटवरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 14 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळांमधून मूळ गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येईल.
येथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
http://ssc.mahresults.org.in
www.mahahsscboard.in
गुण पडताळणीसाठी 3 ते 12 जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी 3 ते 22 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेंतर्गत जुलै-ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 या परीक्षेच्या दोन संधी आहेत.























































