मॉन्सूनची अजूनही प्रतीक्षाच; तीन दिवसांच्या विलंबाने 7 जूनला केरळमध्ये दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे वर्ष तापमानवाढीचे असल्याने यंदा उन्हाळ्यात वाढत्या उकाड्याने काहिली झाली होती. त्यामुळे जून सुरू झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा मॉन्सूमच्या आगमनाकडे लागल्या आहेत. यंदा मॉन्सून उशीराने येणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. मॉन्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, अद्यापही देशात मॉन्सूनची प्रतिक्षा असून मॉन्सूनचे तारीख पे तारीख असे सुरू आहे.आता मॉन्सून तीन दिवस विलंबाने म्हणजेच 7 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सध्याच्या वातावरणाच्या स्थितीप्रमाणे 3 ते 4 दिवस विलंबाने मॉन्सूनचे आगमन होणार आहे. अरबी समुद्रातील दक्षिणेतील भागात मॉन्सूमचे ढग दाटले आहेत. तसेच दक्षिणपूर्व भागातही मॉनेसूनचे ढग दाटून आले आहेत. मात्र, त्यांच्या पुढे सरकण्याचा वेग मंदावल्याने मॉन्सूनच्या आगमनाला आणखई तीन ते चार दिवस लागणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

दरवर्षी मॉन्सून 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. मात्र, यंदा मॉन्सून बंगालच्या उपसागरात काही काळ रेंगाळल्याने त्यांचा प्रवास विलंबाने होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. मॉन्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सून 7 जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदा मॉन्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार आहे. तरीही देशात सरासरीएवढा पर्जन्यमान असण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरी 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. जून आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊसमान कमी राहणार आहे. तर जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.