
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना अतिदक्षता विभागातून (आयसीयू) जनरल वॉर्डात हलवण्यात आले, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयाकडून देण्यात आली.
मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने 22 मे रोजी उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. प्रकृतीमध्ये सुधारणा दिसल्याने त्यांना आयसीयूमधून आज बाहेर काढले गेले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत असे रुग्णालयाने सांगितले.
























































