डेव्हिड ससून लायब्ररीला नवी झळाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आणि अप्रतिम बांधकाम शैली यांच्यामुळे मुंबईच्या सौंदर्यस्थळात भर घालणाऱया डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेचो (रिस्टोरेशन) काम नुकतेच पूर्ण झाले. रिस्टोरेशननंतर लायब्ररी विश्वस्तांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. पुस्तकप्रेमींना आता डेव्हिड ससून लायब्ररीचे आणि रीडिंग रूमचे जुने वैभव नव्याने अनुभवता येणार आहे.

काळाघोडा येथील डेव्हिड ससून लायब्ररीच्या पुनर्स्थापनेची संकल्पना आणि कार्य जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांची आहे. हे काम 16 महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. प्रख्यात जतनीकरण वास्तुविशारद आभा नरेन लांबा यांच्या सहयोगातून करण्यात आले आहे.

पुनर्स्थापनेची वैशिष्टय़े काय?

■ मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड या भाषांतील सुमारे 30 हजार पुस्तके नव्याने रचण्यात आली आहेत.
■ लायब्ररीचे उतरते छप्पर, दर्शनी भाग व अंतर्गत जागांच्या ऐतिहासिक बारकाव्यांचे जतन.
■ अभिजात दगडी बाह्यरचना आणि अप्रतिम अंतर्गत रचनेची पुनर्स्थापना.
■ मूळ मिण्टल टाइल फ्लोअरिंगची पुनर्निमिती
■ ऐतिहासिक फर्निचरचे जतन
■ पुनर्निमित मूळ प्रकाश रचना
■ वारसा इमारतीचे विस्तृत वॉटरप्रूफिंग