अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू असताना मोदींच्या नावाच्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी हात जोडून केली ही विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सोशल मीडियावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीच्या गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या ईस्ट दिल्ली कॅम्पसचा आज उद्घाटन सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी केजरीवाल यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांमधून मोदींच्या नावाच्या घोषणा होऊ लागल्या. मात्र केजरीवाल यांनी त्या फारशा मनावर न घेता हात जोडून घोषणा देणाऱ्यांना थोड थांबा आणि या घोषणा नंतर द्या अशी विनंती केली. त्यांच्या या कृतीमुळे त्यांनी सर्वांची मन जिंकली आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी या उद्घाटनप्रसंगी भाषण करायला सुरूवात केली आणि प्रेक्षकांमधून मोदी मोदी घोषणा होऊ लागल्या. अशावेळी केजरीवाल यांनी हात जोडून या घोषणा नंतर देण्याची विनंती केली. शिवाय पुढे ते म्हणाले की, तुम्ही अशाप्रकारे अडथळे आणल्यास आपण बोलू शकणार नाही. तुम्हाला ही संकल्पना पटली नसेल त्यासाठी आमची काहीच हरकत नाही. पण आम्हाला आमंचं म्हणणं मांडायला 5 मिनीटे द्या आणि् त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुम्ही भाषण सुरू असताना मध्येच बोलू लागलात तर आमचे म्हणणे मांडता येणार नाही. पुढे ते म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. माझ्या भाषणातून मी आक्षेपार्ह असे काही बोलणार नाही. तुम्हाला माझे म्हणणे पटले तर ठिक आहे नाही पटले तरी हरकत नाही. मात्र विनंती केल्यानंतरही प्रेक्षकांमधून गोंधळ सुरूच होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनांने हस्तक्षेप करुन सर्वांना शांत केले.