
फूड डीलिव्हरी कंपनी झोमॅटो सध्या तिच्या जाहिरातीवरून वादात सापडली आहे. संविधानाच्या कलम 338 अन्वये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांना नोटीस पाठवली आहे. या कंपनीने एक जातीयवादी जाहिरातीद्वारे दलित समाजाला बदनाम केल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला आहे.
या नोटीसीला उत्तर देण्यास झोमॅटो असर्मथ ठरली तर समन्स जारी करेला जाणार आहे. 12 जून रोजी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या वादग्रस्त जाहिरातीवूरन 8 जून रोजी वादंग उसळलं होतं. त्यानंतर ही जाहिरात हटवण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिनी प्लास्टिक कचऱ्याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने ही जाहिरात प्रसारित करण्यात आली होती, असं स्षष्टीकरण झोमॅटोने दिलं होतं.
कोणत्याही समुदायाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही झोमॅटोने स्पष्ट केलं आहे. या जाहिरातीत लगान या चित्रपटातल्या कचरा या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आला होता. लगानमधील कचरा ही व्यक्तिरेखा अस्पृश्य दाखवण्यात आली होती.
























































