भाजीत मीठ जास्त झालं तर…? ‘हे’ उपाय करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिमुटभर मीठ साऱ्या पदार्थाचा नूर पालटून टाकते. ज्याप्रमाणे अळणी पदार्थ आपण तोंडात घालू शकत नाही त्याप्रमाणे जर अन्नामध्ये जास्त मीठ असेल तर साऱ्या जेवणाची चवच बिघडते. पण घाईमुळे जेवणात मीठ जास्त असेल तर ते कसे कमी करायचे हे समजत नाही. विशेषत: जर घरात पाहुणे उपस्थित असतील आणि पदार्थातील चुकून जास्त झालेले मीठ ही एक मोठी समस्या बनते. पण आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही जेवणातील अतिरिक्त मीठ काही मिनिटांतच दूर करू शकता.

उकडलेले बटाटे वापरा
उकडलेल्या बटाट्याच्या मदतीने भाजीतील मीठ कमी करू शकता. जर तुमच्या भाजीमध्ये मीठ जास्त आहे आणि उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये असतील तर ते बाहेर काढा आणि सोलून घ्या आणि मोठे तुकडे करून भाजीमध्ये मिसळा. नंतर गॅसवर झाकण ठेवून 1 मिनिट शिजवा. मीठ कमी होईल आणि चवही सुधारेल.

दह्याचा वापर
दह्याच्या मदतीने जेवणातील मीठाचे प्रमाण संतुलित होऊ शकते. यासाठी एका भांड्यात थोडे दही घेऊन ते पाण्यात चांगले मिसळा. आता डाळ किंवा भाजीमध्ये हळूहळू टाका आणि झाकून ठेवा आणि गॅस चालू करा. दह्यात मिसळताच भाजीत मीठाचे प्रमाण संतुलित राहील आणि चवही वाढेल.

लिंबाचा रस
भाजीतील अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी लिंबाचाही सहज वापर करू शकता. कधी कधी उकडलेले बटाटे, दही वगैरे पुरेसे असतेच असे नाही. तेव्हा तुम्ही लिंबू मिसळून काम करू शकता. यासाठी एक लिंबू कापून त्याचा रस काढा. आता भाजीच्या प्रमाणानुसार लिंबाचा रस पिळून त्यात टाका.

भाजलेले बेसन
भाजीत मीठ जास्त असेल तर दोन चमचे बेसन घेऊन तव्यावर चांगले भाजून घ्यावे. बेसनाचा रंग गडद होऊन सुगंध येऊ लागल्यावर भाजीमध्ये घालून हलक्या हाताने मिक्स करा. अशा प्रकारे, मीठाचा प्रभाव कमी होईल, भाजीची चव देखील वाढेल.