चमकदार त्वचेसाठी ५ पदार्थ आहारातून वगळा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोषक तत्वांचा अभाव, चुकीचे खान-पान आणि खराब जीवनशैली यांमुळे त्वचेची चमक निघून जाते. यासाठी विविध प्रकारचे क्रीम, लोशन आणि सीरम इत्यादींचा शोध घेतला जातो. परंतु या गोष्टी केवळ बाहेरून त्वचेचे सौंदर्य वाढवू शकतात. आपण जे काही खातो आणि पितो त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. चुकीच्या आहारामुळे त्वचेवर मुरुम, पुरळ यासारख्या समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण चुकीचे अन्न खातो तेव्हा या समस्या अधिक वाढतात.पौष्ठिक, संतुलित आहार आपल्याला झळाळती त्वचा देतो.. मग त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.

हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड
हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्याच्या सेवनामुळे शरीरात अनेक आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. बटाटे, चिप्स, खजूर, साखर हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ आहेत. त्यांच्या सेवनामुळे त्वचेची चमक निघून जाते .

तळलेले पदार्थ
तळलेल्या वस्तू शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्यांच्या अतिसेवनामुळे त्वचेची चमक निघून जाते , वजन वाढते, हे खाल्ल्याने मुरुमांसोबत तेलकट त्वचेची समस्याही सुरू होते. त्यामुळे त्वचेची चमक कमी होते.

फास्ट फूड
फास्ट फूड खाल्ल्याने शरीरातील अनेक आजारांचा धोका वाढतो. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे वजन वाढण्यासोबतच त्वचेच्या अनेक समस्याही वाढतात. त्यांच्या सेवनामुळे पिंपल्सची समस्याही वाढते.

अतिरिक्त गोड पदार्थ
मिठाई शरीरासाठी खूप हानिकारक आहे. ज्यामुळे वजन वाढते , अनेक आजार होण्याचा धोकाही असतो. मिठाईचे अधिक सेवन केल्याने मुरुमांची समस्या वाढते आणि त्वचेची चमक कमी होते.

चिप्स
चिप्स शरीरासाठी खूप हानिकारक असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आढळून येते, ज्यामुळे त्वचेची चमक कमी होते चिप्स खाल्ल्याने वजनही वाढते आणि तेलकट त्वचा असलेल्या लोकांमध्ये पिंपल्सही वाढतात. या पदार्थांच्या अतिसेवनाने फक्त नुकसानच होऊ शकते. शक्यतो या पदार्थांचे सेवन टाळावे