हर्णे येथे पाणी टंचाईची समस्या तीव्र, आठवडयातून एकदाच पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हर्णे येथे पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. आठवडयातून एकच दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे येथील रहीवाशांचे पाण्याविना हालच हाल होत आहेत.

दापोली तालूक्यातील हर्णे हे गाव मच्छिमारीसाठीचे बंदर म्हणून सुप्रसिध्द आहे. दुस-या क्रमांकाचे मच्छिमारी बंदर म्हणून रत्नागिरी जिल्हयात ओळखल्या जाणाऱ्या हर्णे गावाची मुळ संख्या साधारपणे साडेआठ ते नऊ हजाराच्या आसपास असली तरी व्यापार उद्दीमासाठी येथे आलेल्यांची लोकसंख्याही काही कमी नाही. त्यामुळे हर्णे गावाने 10 हजार लोकसंख्येचा आकडा पार केला आहे त्यामुळे गावाला पाण्याचा पुरवठाही त्याच परिमाणाने होणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा करण्यासाठीचे हर्णे ग्राम पंचायतीकडून काटेकोरपणे नियोजन केले जात असले तरी हर्णे गावाला पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक नळ पाणी योजना ही हर्णे या गावासह, पाजपंढरी, अडखळ आणि शिवाजीनगर या चार गावांसाठीची आहे. या चार गावातील लोकसंख्येचा विचार करता तसेच सध्या लांबलेल्या पावसाने पाण्याची टंचाई निर्माण केली आहे. त्यात बांधतीवरे येथून 21 किलो मिटर दुर अंतरावरून पाणी हर्णे गावात आणले जाते.

हर्णे गावात एकुण 27 ते 28 वाडया मोहल्ले पेठा असून पाणी सोडण्यासाठी नियोजपूर्वक सर्वसमंतत्तीने तीन भाग केले असून या तिन भागांमध्ये आठवडयातून एकदा पाणी सोडले जाते. आठवडयातून एकदाच पाणी सोडले जात असले तरी रहीवाशांचे समाधान होईल अशाप्रकारचे पाणी सोडले जात आहे.या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होतो. मात्र भांडीकुंडी धुणे, आंघोळीसाठी पाणी कपडे धुण्यासाठी पाणी गुरा ढोरांसाठी पाणी कमी पडत आहे. त्यात पाऊस लांबल्याने उन्हाच्या कडक काहीलीने अनेक ठिकाणाचे पाण्याच्या उद्भवाचे स्त्रौत आटल्याने उन्हाळयाच्या दिवसात कितीही पाणी असले तरी ते कमीच पडत आहे. त्यामुळे बोरवेलवरील हातपंपावर पाणी भरण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी रांगच रांग लागून पाण्यासाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे कधी एकदा पाऊस पडतोय आणि पाणी करतोय असे झाले आहे. त्यामुळे हर्णे येथील रहीवाशी पाऊस कधी पडणार याकडे लक्ष लावून आहेत.