पंतप्रधानांच्या समान नागरी संहितेच्या विधानानंतर मुस्लिम कायदे मंडळाची रात्री उशिरा आपत्कालीन बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील सर्वोच्च मुस्लिम संस्था, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ने काल रात्री तातडीची बैठक घेतली. भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना समान नागरि संहितेचा (यूसीसी) उल्लेख केल्यानंतर AIMPLB ने ही बैठक बोलावली होती.

बैठकीच्या सदस्यांनी यूसीसीला विरोध करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या कायदेशीर पैलूंवर चर्चा केली. मंडळाच्या सदस्यांनी ठरवले की मुस्लिम कायदा मंडळ यूसीसीवर कायदे आयोगासमोर आपली बाजू मांडेल आणि कागदपत्रे देखील सादर करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरि संहिता (यूसीसी) ची बाजू मांडल्यानंतर आणि ‘व्होट बँकेचे राजकारण’ खेळल्याबद्दल विरोधकांवर टीका केल्यानंतर, काँग्रेस, डीएमके आणि एआयएमआयएमसह विरोधी पक्षांनी त्यांच्यावर ‘विभाजनाचे राजकारण’ करण्याचा आरोप केला.

विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुद्द्यावर त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की मणिपूर मधील हिंसाचार, महागाई आणि बेरोजगारी यावर लक्ष देण्याऐवजी ते यूसीसीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करीत आहेत.

काँग्रेसचा सहयोगी असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) ने समान नागरी संहितेच्या पंतप्रधान मोदींच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की समान संहिता आधी हिंदूंना लागू करावी.

मध्य प्रदेशात मंगळवारी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ मोहिमेअंतर्गत भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, समान नागरी संहितेच्या (यूसीसी) नावाने लोकांना भडकवले जात आहे. वैयक्तिक बाबींवर नियंत्रण ठेवणार्‍या दुहेरी कायद्यांसह देश कसा कार्य करू शकतो असा प्रश्नही त्यांनी विचारला आणि मुस्लिम समुदायाची दिशाभूल करण्यासाठी आणि चिथावणी देण्यासाठी विरोधी पक्षांनी UCC मुद्द्याचा वापर केल्याचा आरोप केला.