पुण्यातील आयटी अभियंता पाकिस्तानच्या संपर्कात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) पुण्यातील संगणक अभियंता अभिजित संजय जांबुरे या तरुणाला अटक केली आहे. जांबुरे हा मूळचा सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील आहे. तो माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करीत होता.

जांबुरेने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय तांत्रिक माहिती, ओटीपी पुरविल्याचा आरोप आहे. ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने जांबुरेला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून ओडिशा पोलिसांचे पथक भुवनेश्वरला रवाना झाले. जांबुरेने तयार केलेल्या ओटीपींची विक्री सायबर गुन्हेगारांना केल्याचा संशय आहे. पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱयांना त्याने संदेश सुविधेद्वारे (मेसेंजर) ओटीपी दिले होते. तो सोशल मीडियावर संपर्क सुविधेद्वारे काही पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ओडिसा ‘एसटीएफ’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पाकच्या दानिशच्या संपर्कात

आरोपी अभिजित जांबुरे 2018 पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. तो सोशल मीडियावर संदेश यंत्रणेद्वारे फैसलाबाद खानकी येथील दानिश अलिस सय्यद दानिश अली नक्वी याच्या संपर्कात होता. दानिशने अभिजितला अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करीत असल्याची बतावणी केली होती. अभिजितने त्याचा ई-मेल आणि सांकेतिक शब्द दानिशला दिला होता. दानिश अभिजितच्या सल्ल्यानुसार माहिती तंज्ञत्रान कंपनीत काम करीत होता. दानिशला मिळणारी रक्कम तो अभिजितच्या खात्यात जमा करीत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

आरोपी अभिजित जांबुरे पाटण तालुक्यातील विहे गावचा

अभिजित जांबुरे याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाटण तालुक्यातील किहे येथील शाळेत झाले. त्यानंतर कराड येथे त्याने सॉफ्टकेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठात त्याने सांख्यिकी विषयातही पदवी घेतली आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये तो सॉफ्टकेअर इंजिनीअर होता.

अभिजित जांबुरे याची परिस्थिती पूर्की हलाखीची होती. एका खोक्यात त्याचे कडील सायकल दुरुस्तीचा क्यकसाय करून कुटुंब चालकीत होते. प्रतिकूल परिस्थितीत कडिलांनी त्याला शिक्षण दिले. गेल्या महिन्यात तो गाकी आला होता. सध्या गाकातच त्याच्या नकीन घराचे बांधकाम सुरू आहे. तो एकुलता एक मुलगा असून, अकिकाहित आहे. त्याला एक बहीण, आई, कडील असा परिकार आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसांशी संपर्क साधला असता, या घटनेबाबत आम्हाला करिष्ठ पातळीकरून अद्यापि कोणतेही आदेश, सूचना नसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी दिली. अभिजितकरील कारकाईमुळे त्याचे कुटुंबीय आणि गावकरी अस्कस्थ झाले आहेत.