
शुतोकॉन कराटे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्यातील युनायटेड बुडोकॉन कराटे अकादमीतील 4 मुलांनी पदक जिंकण्याची कमाल करून दाखकली. श्रुती पाटीलने सुकर्णासह कांस्य, माही गोरे आणि अक्षरा कोणकरने सुकर्ण तर शौनक म्हात्रेने एक रजत आणि दोन कांस्य जिंकत आपल्या अकादमीला तीन सुकर्णांसह सहा पदकांची कमाई करून दिली.या स्पर्धेत हिंदुस्थानसह अबुधाबी, दक्षिण आप्रिका, इराण, मॉरिशस आणि नेदरलॅण्ड्स या देशांमधील 300 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेतील सर्व विजेत्यांची ऑक्टोबर 2023 मध्ये लंडन येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.




























































