
पालिकेच्या माध्यमातून कुर्ला पूर्व भागातील मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे लवकरच मजबूत करण्यात येणार आहे. यामध्ये कुर्ला पूर्व येथील व्ही. एन. पुरव मार्ग आणि चुनाभट्टी येथील वसंतराव नाईक मार्ग जंक्शनपासून ते राहुल नगर नाला पर्यंत 400 मि.मी. व्यासाची मलनिःसारण वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी पालिका सात कोटी 68 रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेच्या मलनिःसारण प्रकल्पांतर्गत कुर्ला पूर्व येथील व्ही.एन. पुरव मार्ग व चुनाभट्टीतील वसंतराव नाईक मार्ग, राहुल नगर आदी भागांमध्ये जिथे मल वाहिन्यांचे जाळे नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे व्ही. एन. पुरव मार्गासह नाईक मार्ग इथे मल वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी व्ही. एन. पुरव मार्गासह नाईक मार्ग जंक्शन ते राहुल नगर नाला पर्यंत मल वाहिनी टाकल्यामुळे या सभोवतालच्या परिसरातील मलनिःसारण समस्येचे निराकरण होणार आहे.



























































