काळजी नको, तब्बल 70 टक्के जागा रिक्त, अकरावी ऑनलाइन प्रवेशाची आज अंतिम यादी,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दोन गुणवत्ता याद्यांनंतर उद्या, 12 जुलै रोजी सकाळी 10 वाजता तिसरी म्हणजेच शेवटची नियमित प्रवेश यादी जाहीर होणार आहे. पहिल्या दोन्ही गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे शेवटच्या गुणवत्ता यादीकडे आहेत. या फेरीसाठी तब्बल 2 लाख 71 हजार 265 म्हणजेच तब्बल 70 टक्के जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात पसंतीक्रम योग्य भरले असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.

ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत 62 हजार 652 तर दुसऱया गुणवत्ता यादीत 25 हजार 310 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. दोन्ही याद्या मिळून आतापर्यंत 88 हजार 022 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर इनहाऊस, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोटा मिळून एकूण 33 हजार 988 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 22 हजार 010 इतकी झाली आहे.

तिसऱया यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 14 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. ऑनलाइनबरोबरच कोटय़ातील प्रवेशप्रक्रियाही सुरू राहणार असून 12 ते 14 जुलैपर्यंत कोटय़ातील प्रवेशही निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर 14 जुलैला रात्री 8 वाजता कोटय़ातील रिक्त जागा ऑनलाइन प्रवेशासाठी खुल्या केल्या जाणार आहेत. तिन्ही गुणवत्ता यादीनंतर प्रवेशापासून वंचित राहणारे विद्यार्थी तसेच एटीकेटीद्वारे अकरावी प्रवेश मिळालेले, फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या विशेष फेरीचे वेळापत्रक तिसऱया गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर जाहीर होणार आहे.

प्रवेशाची स्थिती…
एकूण जागा 3,83,275
एकूण विद्यार्थी 2,75,448
प्रवेश घेतले 1,12,010 (40.66क)
रिक्त जागा 2,71,265 (70.78क)
प्रवेश मिळाले नाही 1,63,438