वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणारा अटकेत, दीडशेहून अधिक कॅमेरे तपासले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंदिराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी चोरून पळणाऱया चोरटय़ाला जुहू पोलिसांनी अटक केली.  त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार जुहू परिसरात राहतात. त्या पाहुण्यांना सोडण्यासाठी गुलमोहर रोड परिसरात गेल्या होत्या. त्या घरी जात असतानाच एक जण त्यांच्याजवळ आला. इकडे मंदिर कुठे आहे, अशी त्याने विचारणा केली. त्याला महिलेने पत्ता सांगितला. महिला बेसावध असतानाच त्याने महिलेला खाली पाडले. जबरदस्तीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून त्याने पळ काढला.

घडल्या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर महिलेने जुहू पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम, सहाय्यक निरीक्षक गणेश जैन, पाटील, पवार, खोमणे, कणमुसे, पन्हाळे, कांबळी, तायडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. चोरटा हा रेल्वेतून गेल्याचे समजले. पोलिसांनी वांद्रे, दादर आणि ग्रॅण्टरोड स्थानक येथील दीडशेहून अधिक सीसीटीव्ही पॅमेऱयांची तपासणी केली. चोरटा हा ग्रॅण्टरोड येथून पुंभारवाडा परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी पुंभारवाडा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली.