कचरा वाहतूक होणार अधिक जलद; मुंबई होणार चकाचक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दररोज निर्माण होणाऱया हजारो मेट्रिक टन कचऱयाची विल्हेवाट महापालिकेकडून लावली जाते. हा कचरा रोजच्या रोज कॉम्पॅक्टर वाहनाकडून उचलला जातो. मात्र कालबाह्य झालेल्या वाहनांमुळे आता मुंबई महापालिकेने आणखी 32 कॉम्पॅक्टर वाहने घेण्यात आली आहेत. त्यामुळे कचरा उचलण्याची आणि वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून मुंबई अधिक चकाचक होणार आहे.   मुंबईत दररोज 6 हजार 25 मेट्रिक टन कचरा हा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून उचलला जातो. हा कचरा कांजूर आणि देवनार क्षेपणभूमी येथे पाठवला जातो. सरासरी 800 मेट्रिक टन कचरा देवनार क्षेपणभूमी येथे पाठवण्यात येतो. दैनंदिन कचरा, गाळ आणि राडारोडा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱया एकूण वाहनांमध्ये 246 वाहने मुंबई महापालिकेची तर 1 हजार 694 वाहने ही पंत्राटदारांची आहेत. या वाहनांमध्ये नव्या कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे.

पूर्व उपनगरासाठी 15 वाहने 

एका कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून सध्या 6 मेट्रिक टन कचरा वाहून नेला जातो. नव्या दाखल झालेल्या 32 कॉम्पॅक्टर वाहनांपैकी मुंबईसाठी 6, पश्चिम उपनगरे 11 आणि पूर्व उपनगरासाठी 15 वाहने उपलब्ध झाली आहेत.

जुलैमध्ये 5 हजार 23 तक्रारी

मुंबई महापालिकेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर जुलै अखेरीपर्यंत 5 हजार 162 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यापैकी घनकचरा विभागाशी संबंधित 5 हजार 23 तक्रारी आल्या होत्या. तक्रारींपैकी 5 हजार 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर 139 तक्रारी इतर कारणांशी संबंधित होत्या.