
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ती व्यक्ती विकृत असून त्यांच्या तक्रारीत काही तथ्य नाही. चौकशीमध्ये मी माझी बाजू मांडली असं वायकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रवींद्र वायकर म्हणाले, खोटा आणि विकृत असलेल्या अशा माणसाला लिंगपिसाटच बोलले पाहिजे. जो समाजात पडलेला आहे. आज देखिल वरच्या ऑफिसरकडे येऊन खालून फोन करतो तो मनुष्य किती विकृत असेल. हा असा विकृत मनुष्य लोकांना त्रास देणारा आहे. त्यापद्धतीने मी स्टेटमेण्ट दिली आहे. जाणून बुजून एखाद्या लोकप्रतिनिधीवर आरोप करायचे आणि त्यांचे उद्दीष्ट साध्य झाले की, हा मनुष्य आता आपल्या पक्षात येतोय. त्यानंतर तो मनुष्य निरमा पावडरमध्ये संपूर्ण धुतल्यासारखा होऊन जातो. अशापद्धतीने त्याची पद्धत होती असेही ते माध्यंमाशी बोलताना म्हणाले.
मुंबई पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलंच बांधंकाम केल्याचा आरोप तसेच मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बॅंक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आमदार रवींद्र वायकर यांच्यावर करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांची आज पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी चौकशीला घाबरत नाही, बोलावतील तेव्हा जाईन असेही सांगितले.
























































