
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा दरम्यान धावणाऱया मेट्रो-1चे संचलन मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) या कंपनीकडून केले जात असून आता ही कंपनीच आर्थिक संकटात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) 416 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे एमएमओपीएलचे धाबे दणाणले आहेत.
एमएमओपीएल हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्राचा संयुक्त उपक्रम आहे. मुंबईतील पहिल्या मेट्रोच्या संचलनाची जबाबदारी 2014 पासून एमएमओपीएलवर आहे. मेट्रो वनची 76 टक्के भागीदारी एमएमओपीएलकडे तर 26 टक्के भागीदारी एमएमआरडीएकडे आहे.
– मेट्रो 1 च्या उभारणीचा सुरुवातीला असलेला खर्च 2356 कोटींचा बांधकाम खर्च 4321 कोटींवर गेला. हा खर्च वसूल करण्यासाठी मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करण्याची विनंती करून पंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र एमएमओपीएलला काही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे मेट्रो वन तोटय़ात आहे.


























































