सरकारचा नाकर्तेपणा, एसटी कामगारांच्या पगाराची तारीख हुकली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांच्या पगाराची तारीख मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हुकली आहे. एसटी महामंडळाने विविध गटांतील प्रवाशांना दिलेल्या सवलतीची रक्कम चुकती करण्यासाठी राज्य सरकारने विलंब केला आहे. त्यामुळे दर महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार अद्याप होऊ शकलेला नाही.

एसटीला दररोज येणाऱया महसुलातून इंधन आणि देखभालीचा खर्च भागवला जातो. तर सरकारने जाहीर केलेल्या सवलतीच्या माध्यमातून मिळणाऱया रकमेतून पगाराचा खर्च भागवला जातो. एसटी कर्मचाऱयांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होत असल्याने सरकारकडून त्याआधीच सवलतीची रक्कम दिली जाते. मात्र जून महिन्यातील सवलतीची रक्कम देण्यास सरकारने विलंब केल्याने जुलै महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही.

z दरम्यान सरकारने आज सवलतीचे 334 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने पुढील एक-दोन दिवसांत थकीत वेतन होऊ शकणार आहे.