स्वातंत्र्यदिनी देशविरोधी नारे; दोघांना घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यामध्ये काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचा फोटो नाचविण्याची घटना घडल्यानंतर मोठा दंगा झाला होता. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ही घटना ताजी असतानाच, आता पुन्हा नगरमध्ये भिंगार कॅम्प येथे जवानांच्या समोरच स्वातंत्र्यदिनी देशविरोधी नारे दिल्याने वातावरण तापले. त्यावेळी जवानांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर तिघे पळून गेले. याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता, शनिवार (दि. 19) पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

 

परवेज इजाज पटेल (वय 21, रा. आलमगीर भिंगार, नगर) आणि अरफज ऊर्फ बबई शेख (रा. कोठला, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. तर तीन अल्पवयीन फरार आहेत. याबाबत आर्मड बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटचे हवालदार प्रशांतकुमार श्री चंदेश्वरसिंग यांनी फिर्याद दिली आहे.

15 आगॅस्ट रोजी नगरमध्ये भुईकोट किल्ल्याच्या इथे स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक लोक किल्ला पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे लष्करातील काही जवान डय़ुटीवर होते. या किल्ल्याच्या हाथी गेटसमोर परवेज पटेल व अरफज शेख यांच्यासह तीन-चार अल्पवयीन मुले उपस्थित होती. त्या मुलांनी ‘ना रहे तकदीर, हिंदुस्थान तेरे तुकडे तुकडे होंगे, इन्शा अल्लाह’ अशा घोषणा दिल्या. त्यावेळी तेथील कर्मचारी पवन सिंग, दिलीप भीषण यांनी दोघांना पकडले, तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या जवानांनी परवेज पटेल व अरफज शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.