
आय फ्लूने चंद्रपूरकर त्रस्त झाले असतानाच आता जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात एकूण 371 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 53 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये भद्रावतीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी चंद्रपूर शहरातील एकोरी वॉर्डातील एका 14 वर्षीय मुलाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. वातावरणात मोठा बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप, टायफॉइड, डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.


























































