
अर्धापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अर्धापूरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळा जाळून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी रोजी आंदोलन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा,मालेगाव,कामठा येथील दुकाने बंद करून रस्त्याने राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात येऊन तहसीलदार मार्फत निवेदन देऊन मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, युवक काँग्रेसचे पप्पू कोढेकर, संचालक निळकंठराव मदने, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उद्धवराव राजेगोरे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी नगराध्यक्ष नासेर खान पठाण, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब, चेअरमन प्रविण देशमुख, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील टेकाळे, तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर, उपसभापती अशोक कपाटे, उपतालुका प्रमुख अशोक डांगे, संतोश कदम, उपशहर प्रमुख शिवप्रसाद दाळपुसे, गजानन गव्हाणे, सरपंच दत्ता नवले, राजू कल्याणकर, उमेश सरोदे, शिवसेनेचे शहरप्रमुख काजी सल्लावोद्दीन, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश क्षीरसागर, शेख रफिक, नगरसेवक सलिम कुरेशी, सोनाजी सरोदे, डॉ.आनंद शिंदे, बळीराम पाटील हट्टेकर पांगरीकर, बबनराव लोखंडे, बाळू माटे, व्यंकटी राऊत, बाबाराव सरोदे, वसंतराव कल्याणकर, मनोज कदम, राजाराम पाटील पवार, सोशल तालुकाध्यक्ष गुणवंत सरोदे, संतोष कपाटे, बाबूराव जाधव, रमेश क्षीरसागर, विशाल नरवाडे, सचिन बुटले उपस्थित होते.
























































