तृणमूलच्या खासदार नुसरत यांना ईडीचे समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने समन्स पाठवले आहे. 12 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. एका रियल इस्टेट पंपनीवर न्यू टाऊन परिसरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप नुसरत जहां यांच्यावर आहे, तर पंपनीकडून कर्ज घेतले होते, परंतु मे 2017 मध्ये व्याजासह परत केल्याचे नुसरत जहां यांनी म्हटले आहे.