ब्लू स्टार इंडियातील 49 कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय; भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे वाडा येथील ब्लू स्टार इंडिया लिमिटेड कंपनीतील 49 कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करण्यात आले आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी आनंद व्यक्त केला असून भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

वाडा येथील ब्लू स्टार इंडिया लिमिटेड कंपनीतील गेली 10-12 वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया 49 कामगारांना नोकरीत कायम करण्यात भारतीय कामगार सेनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते- खासदार तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली 5 सप्टेंबर रोजी ब्लू स्टार कंपनीतील व्यवस्थापनाशी विशेष चर्चा करण्यात आली. ब्लू स्टार कंपनीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी केल्यामुळे संपूर्ण कामगार क्षेत्रात एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

यावेळी व्यवस्थापनाचे सीएचआरओ व्ही. एस. अशोक, वरिष्ठ महाव्यवस्थापक सुशील देशपांडे, महाव्यवस्थापक एच.आर. व आय. आर. मंगेश वाळवे, महाव्यवस्थापक अमित मेहता, विभागीय महाव्यवस्थापक एच.आर. राजेश यादव, तसेच युनिट अध्यक्ष किरण मालप, युनिट सदस्य नितीन तरे, सुधीर पाटील, सतीश बागुल आदी कामगार उपस्थित होते.