
सर्वोच्च न्यायालयाने वेळकाढूपणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच खडसावत मंगळवारपर्यंत याचिका निकाली काढण्याबाबतचे वेळापत्रक सादर करावे, असे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयात याबाबत झालेल्या सुनावणीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद करत विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा सुरूच असल्याचे म्हटले आहे. सुधारीत वेळापत्रक देण्यात आले नसल्याने आम्ही आदेश देऊ, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
याआधीच्या सुनावणीत आम्ही वेळापत्रक देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे सर्व पक्षांसोबत बसून आज वेळापत्रक सादर करणे अपेक्षित होते. मात्र, ते सादर झाले नसल्याने आम्ही आदेश देणार आहोत. यावेळी विधानसभा अध्यक्ष अजूनही वेळकाढूपणा करत असल्याचे कपिल सिब्बल म्हणाले. त्यामुळे न्यायालयाने आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला इतर काहीही सांगू नका, वेळापत्रक सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

























































