विजयानंतर हिंदुस्थानी संघाचा ड्रेसिंगमध्ये जल्लोष, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात हिंदुस्थानच्या संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. या विजयासह हिंदुस्थानी संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या उपांत्य फेरीत विजय मिळवून हिंदुस्थानी संघाने फायनलचे तिकीट मिळवले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंनी त्यांचा हा विजय चाहत्यांसोबत साजरा केला. हिंदुस्थानी संघाच्या ड्रेसिंग रुममधील जल्लोष पाहण्यासारखा होता. बीसीसीआयने त्यांच्या या जल्लोषाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हिंदुस्थानी संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर बीसीसीआयने त्यांना एक व्हिडीओ पोस्ट केला. न्यूझीलंडचा धुव्वा उडविल्यानंतर हिंदुस्थानी संघ ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष करताना दिसत आहे. यावेळी खेळाडूंनी चाहत्यांसोबत आपला विजय साजरा केला. चाहत्यांसोबत, सेल्फी, एकमेकांना गळाभेट, बॅटवर ऑटोग्राफ असे आनंदाचे वातावरण दिसत आहे. यावेळी व्हिडीओत युजवेंद्र चहलही दिसत आहे. तो उपांत्य फेरीतील सामना पाहण्यासाठी मुंबईत आला होता. सामन्यानंतर त्यानेही खेळांडूंची भेट घेतली. अश्विन याने मोहम्मद शामीचे खास अंदाजात अभिनंदन केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेण्ट्स येत आहेत. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.