
तेलंगणात काँग्रेसने बीआरएस आणि भाजपला धोबीपछाड दिली असली तरी कामरेड्डी मतदारसंघात मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संभाव्य मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या दोघांनाही भाजपचे उमेदवार कटिपल्ली व्यंकट रमण रेड्डी यांनी पराभूत केले आहे. दोन बडय़ा नेत्यांचा पराभव करणारे कटिपल्ली रेड्डी हे जायंट किलर ठरले आहेत. रेवंत यांनी कामारेड्डी आणि कोडंगल या दोन जागांवरून निवडणूक लढवली होती तर, केसीआर यांनीही गजवेल आणि कामारेड्डी अशा दोन जागा लढवल्या होत्या. या दोघांनाही कटिपल्ली यांनी कामारेड्डीत टिकू दिले नाही.

























































