
शरीर आणि मनाला ताजेतवाने ठेवून कला आणि व्यायामाची सांगड घालणाऱ्या स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटला दिंडोशीकरांनी दुसऱ्या सत्रात दणदणीत प्रतिसाद दिला. गेल्या रविवारी आणि आज सकाळी झालेल्या दुसऱ्या सत्रातही सुमारे 10 हजार जणांनी उपस्थिती लावली. यात लहान मुलांसह मोठेही मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून सर्वांचा उत्साह तर वाढवलाच, पण आरोग्यदायी टिप्सही दिल्या. त्याचबरोबर स्वेट ऑन स्ट्रीट या आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजक युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काwतुक केले.
स्वेट ऑन क्लबच्या पुढाकाराने दिंडोशीतील नागरी निवारासमोर असलेल्या रहेजा हाईट्स ते रहेजा गार्डन या सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावर आज सकाळी 7 ते 11 या वेळेत या कार्यक्रमांचा आनंद दिंडोशीवासीयांनी घेतला. यात रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळधाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्णनगर, संतोषनगर या वसाहतीतील 10 हजार दिंडोशीवासीय सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना नेते, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विभाग संघटक साधना माने, अभिनेते संदीप पाठक, उपनेत्या शीतल देवरुखकर, माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, युवासेना सहसचिव समृद्ध शिर्पे, शाखाप्रमुख संदीप जाधव, शाखाप्रमुख संपत मोरे, युवासेनेचे रुपेश कदम, प्रशांत मानकर तसेच सर्व शिवसेना, युवासेना व इतर अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटमधले कला, क्रीडा प्रकार
क्रिकेट, बॅडमिंटन, कराटे, कबड्डी, स्केटिंग, बुद्धिबळ असे वेगवेगळे खेळ, व्यायाम व फिटनेसचे प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, जादूचे प्रयोग,पॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेली योगाची प्रात्यक्षिके, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे आणि आलेल्या अडचणींवर कसे मिळवायचे यावर उपाय आदी कलागुणांना वाव देणाऱ्या विविध प्रकारांचा आनंद सर्वांनी घेतला.
























































