घरबसल्या मिळेल VIP नंबर…करा फक्त एवढे काम…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिया टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओची लोकप्रियता वाढत. तुम्हाला जिओचा व्हीआयपी नंबर मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल. खरंतर व्हीआयपी नंबरची वेगळीच क्रेझ आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्च करायला अनेकजण तयार आहेत. VIP नंबरद्वारे यूजर त्यांचा आवडता क्रमांक निवडू शकतात. यासाठी तुम्हाला Jio.com वर दिलेली प्रक्रिया फॉलो करावी लागेल. जाणून घ्या ही खास प्रक्रिया.

जिओचे व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी, प्रथम www.jio.com पोर्टलवर जा किंवा तुम्ही www.jio.com/selfcare/choice-number/ वर क्लिक करा. त्यानंतर  तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाइल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर त्या नंबरवर मिळालेल्या OTP ने लॉगिन करा. यानंतर यूजर त्यांच्या पसंतीचा क्रमांक घेऊ शकतात.

यानंतर प्रक्रियेत पुढे गेल्यास वापरकर्त्यांना काही मोबाइल नंबर दिसतील. यानंतर दिसणाऱ्या नंबरच्या बाजूला असलेल्या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही ते खरेदी करू शकता. यासाठी 499 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यानंतर तुम्हाला हवा तो नंबर मिळेल.