Photo – जस्ट लुकिंग लाईक अ वॉव! पांढऱ्या लेहेंग्यात तृप्ती दिसतेय भलतीच नाजूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅनिमल चित्रपटानंतर नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. ओटीटीपासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचं नाणं तिने खणखणीत वाजवलं असून तिच्या सौंदर्याने प्रेक्षक घायाळ झाले आहेत. त्यामुळे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. तृप्तीने देखील आपल्या चाहत्यांना निराश केलेलं नाही. तिने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती भलतीच सुंदर आणि नाजूक दिसत असल्याची प्रतिक्रिया तिचे चाहते देत आहेत.