शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू झगमगला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱया 22 किलोमीटर लांबीच्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे काम पूर्ण झाले असून हा पूल 1200 दिव्यांनी अक्षरशः झगमगून निघाला आहे. पुलावर 130 सीसीटीव्ही कॅमेरा पोलचाही समावेश आहे. सागरी सेतूवर सहा मार्गिका आणि आपत्कालीन मार्ग असलेल्या या पुलावर 1089 पिलर असून 1 हजार 200 विद्युत खांब आहेत. या सेतूमुळे अवघ्या 15 मिनिटांत नवी मुंबई गाठता येईल.