सुवर्णकार संघाचे नेते मधुकर चाचड यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ. भा. सुवर्णकार संघाचे माजी अध्यक्ष आणि मुंबई सुवर्णकार संघाचे ‘भीष्माचार्य’ मधुकर चाचड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 97 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

देशात लादलेला सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढय़ाचे नेतृत्व मधुकर चाचड यांनी केले होते. हा कायदा रद्द होईपर्यंत चाचड यांनी सहकाऱ्यांसह पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघातही त्यांनी अनेक पदे भूषवली होती. सुवर्णकार संघाने त्यांना ‘सुवर्णरत्न’ ही पदवी देऊन सन्मान केला होता. मधुकर चाचड हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तसेच माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचे निकटकर्तीय होते. त्यांचे पार्थिव जव्हेरीबजार येथील सुवर्णकार संघाच्या कार्यालयात दर्शनासाठी ठेकण्यात आले होते. दादर वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी असंख्य सुवर्णकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यकर उपस्थित होते. सुवर्णकार संघाचे संजय (नाना) वेदक, नंदकुमार लवेकर, संजय पितळे, विजय पितळे, अदिप वेर्णेकर यांनी चाचड यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई व महाराष्ट्र सुवर्णकार संघातर्फे 2 जानेकारी 2024 रोजी दादर येथील हरी महादेक वैद्य सभागृहात सायंकाळी 5 वाजता चाचड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे.