ओटीटी क्वीन तमन्ना भाटिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने ओटीटी क्वीन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 2023 हे वर्ष तमन्नासाठी सर्वात लक्षवेधी ठरले. वर्षभरात ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमन्नाचे वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी कौतुक झाले.

‘जी कारदा’ मध्ये तमन्नाने लावण्या सिंग कुशलतेने साकारली. स्वतःच्या शोधाच्या प्रवासात असलेली लावण्या आणि तिची अनोखी कहाणी यातून बघायला मिळली. ‘लस्ट स्टोरीज 2 मध्ये ’ तमन्नाने शांती चव्हाण ही भूमिका केलेय. तमन्ना भाटियाने ‘आखरी सच’ मध्ये इन्स्पेक्टर अन्या स्वरूप साकारून प्रेक्षकांना जिंकले. करारी पोलीस अधिकाऱयाची ही भूमिका होती. नव्या वर्षात जॉन अब्राहम सोबत ती स्क्रीनवर दिसणार आहे. निखिल अडवाणीच्या ‘वेदा’ या हिंदी चित्रपटात ती काम करतेय. ‘अरनमनाई 4’ या तमिळ चित्रपटातही तमन्नाची प्रमुख भूमिका आहे.