
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकशाहीची हत्या करत आमदार अपात्र प्रकरणी धक्कादायक निकाल दिला. या निकालाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयटीआय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्यासह आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल नार्वेकर यांनी दिलेला हा निकाल दबावाखाली देण्यात आल्याचा आरोप नांदेड शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.यावेळी सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, बबन बारसे, महानगरप्रमुख प्रदीप उर्फ पप्पू जाधव, जिल्हा समन्वयक नेताजी भोसले, तालुकाप्रमुख अशोक मोरे, शहर प्रमुख अर्जुन ठाकूर यांच्यासह आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर यांनी राजकीय दबावापोटी तसेच दिल्लीच्या नेत्यांच्या सांगण्यावरुन आमदार अपात्रतेचा निर्णय सभापतींनी दिला.
खरा निर्णय जनताच देईल- जिल्हाप्रमुख माधव पावडे
गद्दारांनी राज्यात सत्ता स्थापन करून खर्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा जो घाट घातला आहे तो घाट या महाराष्ट्रातील सुजाण नागरिक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. सत्तेचा गुलाम असलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा दिल्लीकरांच्या इशार्यावरचा निर्णय आहे. त्यामुळे जनतेच्या मनातून उद्धव ठाकरे यांना संपवणे कोणालाही शक्य नाही. येणार्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जनताच गद्दारांचा आणि भाजपाचा खरा निकाल देईल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी व्यक्त केला.


























































