सायकलने तळोधी ते अयोध्या साठी निघालेला रामभक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या येथे 22 जानेवारीला श्री राम मंदिरात राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याने राम भक्तांमध्ये उत्साह आहे. देशभर वातावरण भक्तिमय झालेले पहावयास मिळत आहे. अयोध्येतील राममंदिराची चर्चा सुरू असतांनाच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी गावात राहणाऱ्या महेश शिवणकर हा रामभक्त तरुण सायकलने अयोध्याला रवाना झाला. 900 किलोमीटर चा प्रवास सायकल ने करण्याचा निश्चय करून प्रवास सुरु केला. त्याच्या या प्रवासाची माहिती होताच लोकांनी महेश ची भेट घेत त्याला पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. गावकऱ्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने कोणत्याही संकटांवर मात करुन मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी हजर होईल असा विश्वास महेश ने व्यक्त केला.