मोनेगिरी – क्रिशनुळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय मोने

क्रिश आणि त्याची पत्नी मैना आम्हाला नीटसे कधी कळलेच नाहीत. क्रिशचं बेफिकीर, ऐटबाज असणं हे केवळ वृत्ती म्हणून नव्हतं तर त्याच्यातील दिलखुलास माणूसपण जपणारं होतं. क्रिश नुळकरचं हे माणूसपण त्याच्या जाण्यानंतरही टिकून राहीलं ते त्याच्या स्वभावगुणांमुळे.

या क्रिशनुळकर नावाच्या व्यक्तीविशेषाचं आडनाव कळू शकतं, पण क्रिशनावावरून त्याचं पहिलं नाव नेमकं काय असेल याबद्दल कोणालाच माहीत नाही. असण्याची आता काहीच गरज नाही. कदाचित किशोर असेल किंवा कृष्णकांत असेल किंवा तत्सम काहीही, पण आता त्याबद्दल चर्चा होणं शक्य नाही. म्हणजे आमची आपापसात होऊ शकेल, पण त्याला विचारता येणार नाही. कारण तो या जगातून कायमचा निघून पुढच्या प्रवासाला गेला आणि त्यालाही आता खच्चून दहाबारा वर्षे झाली आहेत. तसा तो आमच्या संपर्कात आला तेव्हा आम्ही सगळे चाळिशीच्या उंबरठय़ावर होतो आणि तो पंचावन्न किंवा साठीच्या आसपास होता. पुण्यात सकाळी फिरायला जायच्या काही जागा होत्या. काही सपाट मैदानावर चालायला किंवा धावायला जायचे, काही पुण्यातल्या टेकडय़ांवर (आता बहुतेक सगळ्या झोपडपट्टी आाढमणांमुळे नामशेष झाल्या आहेत) जायचे आणि साधारण चार-पाच किलोमीटर चालायचे. हा नुळकर मात्र कायम जमिनीलगत चालायला जायचा आणि विचार अस्मानी करायचा. आमच्यात असून तो कायम आपल्या स्वप्नात आणि विचारात साधारण तरंगत असायचा. त्याचं वय बघता त्याला “अहो!” म्हणावं हे रीतसर होतं (अगदी पुणेरी स्वभाव किंवा व्यक्तीनुसार रीतसर हां! कारण पुण्यात अशोकचा अशक्या होतो, राहुलचा राव्हल्या होतो. तरीही, असो! पण त्याला सगळे किश्या म्हणायचे. म्हणणाऱयाचं वय साधारण अठरा ते पंचाहत्तर असायचं). तो मात्र सगळ्यांना हात हलवून प्रत्त्युत्तर करायचा. कायम उत्कृष्ट कपडे अंगावर बाळगून असायचा.

तो आणि त्याची बायको. दोघेही सकाळी फिरायला यायचे. ती साधारण कपडय़ांत असायची आणि किश्या मात्र कडक इस्त्राr केल्यासारखे कपडे परिधान करून असायचा. महागातली विजार, त्यावर तितकाच महाग टी-शर्ट, गळ्याशी लगट करणारा स्कार्फ (त्याचा आवडता नायक देव आनंद होता. म्हणून तो स्कार्फ), पायात ब्रंडेड शूज, तेही महागातले. म्हणजे त्या काळातले तीन-चार हजार रुपयांचे (आत्ताच्या भावात मोजायचे झाले तर फारच महाग, सुमारे दहा, पंधरा, वीस हजारांचे). मारे ऐटीत फिरायचा. पहिल्या साधारण पाच-सातशे पावलांत तो आपल्या बायकोला मागे टाकून झपझप फिरत पुढे यायचा. साधारण तीन-चार किलोमीटर चालल्यावर तो शांतपणे कट्टय़ावर येऊन विसावायचा. खिशातून त्याची उंची सिगारेट काढून शिलगवायचा.

“मैना! कुठे आहे रे? आहे का आजूबाजूला?” (त्याच्या बायकोला तो मैना म्हणायचा. “तिला मैना का म्हणतोस? मीनाक्षी नाव आहे का तिचं?” असं एकदा विचारलं तर त्याने काय उत्तर दिलं असेल?)
“नजर कडक आहे तिची! पण म्हणून कावळीण असं कसं म्हणणार? कारण मग मी कावळा होईन ना?”
बायको मागाहून यायची. तोपर्यंत सिगारेट संपवून खिशातून भाजके चणे काढून त्याची एक फक्की तोंडात सोडायचा. तोपर्यंत ‘मैना’ येऊन बाजूला बसायची. ती आली की, हा विचारायचा “सकाळी न्याहारी काय करायची?”
“घरी जाऊन बघू या. मी करते काहीतरी.” मैना उत्तर द्यायची.
“वेडी आहेस का? नको. मी काहीतरी घेऊन येतो. चल!” मैना घराकडे जायची. ती गेल्यावर किश्या मस्तपैकी फुलून यायचा.
“ती मानसी रेगे दिसली नाही रे आज!” कोणाला तरी तो कुतूहलात्मक आवाजात विचारायचा.
“किश्या! परवापर्यंत नाडकर्णीबद्दल विचारत होतास ना रे?”
“हो का?असेल! तिची आणि माझी यायची वेळ जमत नाही! आपण आयुष्यात कोणाची वाट बघत नाही! तशी ती नाडकर्णी दिसायला बरी आहे जास्त. पण आता ती आपल्या वेळेला भेटत नाही. आता तिची वाट बघत कुठे थांबणार?”
“का? का नाही थांबणार? तुला काय कामं आहेत ािढश?” असं कोणी विचारलं की,
“क्रिशकोणासाठी थांबत नाही. चिवडा करताना तूप मिळालं नाही तर तो करण्यासाठी थांबायचं नाही. तेलातला करायचा. चवीत फार फरक पडत नाही.” असं बिनतोड उत्तर द्यायचा. त्याच्या उत्तराचा नेमका अर्थ काय? हे बऱयाच लोकांना कळायचं नाही. अर्थात त्याला त्याची फिकीर नसायची. तो मानसी रेगेची वाट बघायचा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मानसी यायची आणि दोघे बोलायला लागायचे. त्यांचं बोलणं सुरू झालं की, तो “आता निघा” अशी खूण करायचा आणि आम्ही सगळे निघायचो. दुसऱया दिवशी त्याला कोणीतरी विचारायचं,
“ क्रिश! काय बोललास काल?”
“तुमच्या बुद्धीच्या क्षेत्राच्या बाहेरचं आहे. सोडा! त्यापेक्षा आपण सोडा लेमन पिऊ या” असं म्हणून आपण केलेल्या विनोदावर (?) तो खळखळून हसायचा.
क्रिशआणि त्याची मैना ही आमची त्या काळातली सकाळी फिरायला येणाऱया सगळ्या जोडप्यांपेक्षा आगळी आणि गंमतदार जोडी होती. अनेक वर्षे आम्ही सकाळी फिरायचो. साधारण दहाबारा वर्षे झाली. ािढशला नात झाली अशी बातमी आम्हाला कळली.
“क्रिश ! आजोबा झालास तू? अभिनंदन!”
“गप बसा! माझ्या मुलाला मुलगी झाली. मला कुठे काय झालं? उगाच आजोबा म्हणून माझं वय वाढवू नका. तुम्ही मारे स्वतला जवान समजता, उगाच आवाज करू नका.”
“ गोळी घ्यायची वेळ झाल्ये. घरी चला!” मैनेने एकदा जोरदार आवाज दिला. वरकरणी सगळ्यांच्या मते क्रिशजरा छचोर होता, पण एका प्रसंगाने आम्हा सगळ्यांना फारच धक्का दिला. झालं असं की, त्याच्याशी बहुतेक जण, खरं तर जणी, बोलत असायचे. अगदी गुलूगुलू म्हणतात तसं. एके दिवशी एका बडय़ा मोठय़ा गाडीतून काही लोक उतरले. गुंड म्हणावेत असे. एका मुलाची त्यांनी चौकशी केली. तो तिथे नव्हता म्हणून ते निघून गेले. काही वेळाने तो मुलगा आला. क्रिशने त्याला आपल्या गाडीत लपवले. मग एक मुलगी आली, क्रिशदोघांना आपल्या गाडीतून घेऊन कुठेतरी गेला. दुसऱया दिवशी पुन्हा ते गुंडछाप लोक आले. बरोबर एक त्यांचा म्होरक्या वाटावा असा सोन्याने अंग झाकून घेतलेला काळारोम माणूस होता. त्याचा आणि ािढशचा संवाद झडला…
“काय क्येलं माझ्या पोरीचं?”
“तुम्ही आयुष्यात करू शकणार नाही ते…लग्न!”
“मला विचारल्याशिवाय लग्न लावनारे तुम्ही कोन?”
“तुमचा काय संबंध? त्या दोघांना करायचं होतं. मी आणि माझ्या बायकोनं कन्यादान केलं.”
“लई म्हागात पडेल. मी कोन त्ये खबर हाय का?”
“राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नाही एवढं नक्की. आता उरलेल्या कोणापैकी असाल तर निघा! काय करणार तुम्ही? मला मारणार? पण त्यामुळे तुमच्या मुलीचं लग्न रद्द होणार नाही. मैने! जरा समजाव यांना”क्रिशने त्याच्या बायकोला सांगितलं.
“हे बघा साहेब! इथून गेला नाहीत तर माझ्यावर अतिप्रसंग केलात म्हणून पार करीन. फाडू माझा ब्लाऊज?” असं म्हणत मैनेने तयारी केली. तो काळारोम माणूस पुटपुटत रागारागाने निघून गेला.क्रिशने आपल्या मैनेला जवळ घेऊन तिचा झक्कास मुका घेतला.
“हे सगळं न करताच किस केलं असतं तर मला चाललं असतं की!” तिने भर पार्कात सगळ्यांसमोर ािढशची इज्जत काढली.
त्यानंतर मैना अचानक हे जग सोडून गेली. क्रिशत्यातून सावरला असावा. कारण त्यानंतर त्याचा सगळा ऐटबाजपणा लोप पावला. इतर म्हाताऱयांसारखा तो बेंगरूळ कपडय़ांत वावरायला लागला.
“मैना माझ्या आयुष्यातला सगळा रंग आणि सूर घेऊन गेली.” असं तो वारंवार म्हणायचा. काही दिवसांनी पार्कातच तो टेकून बसला, तो उठलाच नाही.
त्याच्या घरी त्याचं अंतिम दर्शन घ्यायला आम्ही सगळे गेलो तेव्हा असंख्य लहान जोडपी हमसाहमशी रडत होती. चौकशी केली तेव्हा कळलं, ज्यांच्या लग्नाला घरून विरोध होता अशा जोडप्यांचं लग्न लावून त्यांची पुढची जबाबदारी क्रिशआणि मैना घ्यायचे. पोटच्या पोरांपेक्षा त्या जोडप्यांचा आाढाsश कानाला दुखावून गेला. क्रिशआणि मैना आम्हाला नीटसे कधी कळलेच नाहीत.
❚ [email protected]