
नगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी कोपरगाव वकील संघाच्या वतीने कोपरगाव न्यायालयातील वकील बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सदर वकिल दाम्पत्याच्या हत्येचा तीव्र शब्दांत सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
नगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकीली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य 25 जानेवारी पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले.
यावेळी अध्यक्ष ॲड. एम. पी. येवले, यांनी वकील आढाव दांपत्याच्या झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली व सदर दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकदिवसीय कामकाज बंद ठेवण्या ठेवण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी वकिलांना आवाहन करताना अध्यक्ष येवले यांनी हा वकीलांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वरून आरोपी कीती निर्ढावलेले आहेत याचा प्रत्यय येतो. समाजातील वाईट अपप्रवृत्ती पासून वकीलांना कायद्याने सरंक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता राजस्थानच्या धरतीवर महाराष्ट्रातही अडव्होकेट प्रोटेक्षन बिल मंजुर करून वकीलांना संरक्षण द्यावे असे निवेदन महाराष्ट्र व गोवा बार असोसिएषन यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान सदर घटनेचा निषेध म्हणून कोपरगावचे तहसिलदार भोसले, कोपरगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.




























































