ऋण जन्मदात्यांचे       

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे, त्यांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य आहे. पण अनेकदा मुले स्वतःच्या पायावर उभे राहिली की त्यांना आई-वडिलांचे ओझे वाटायला लागते आणि ते जबाबदारी झटकून मोकळे होतात. पोटची मुले असूनही आईवडिलांना एकटे रस्त्यावर निराधार सोडले जात असल्याची 32 हजारांच्या वर प्रकरणे आज आपल्या देशात आढळली आहेत.

गेल्या 10-15 वर्षांत झपाटयाने बदलणाऱया समाजातल्या नीतीमूल्यांकडे पाहात, स्वतःच्या घरातल्या प्रसंगाशी दोन हात करत व एका सत्यघटनेने प्रेरित होत लेखिका, दिग्दर्शक व निर्माती कांचन अधिकारी ‘जन्मऋण’ नावाचा संवेदनशील सिनेमा घेऊन आली आहे. ती सांगते की, ‘ज्येष्ठांच्या या अत्याचाराच्या पेंद्रस्थानी मालमत्ता आणि बेफिकीर वृत्ती आहे. ‘जन्मऋण’ ची कथा एका सुसंस्कृत मराठी घरात घडलेल्या घटनेवरून बेतलेली आहे. मुलं कमावती झाली की त्यांना वाटतं की आईबाबांनी त्यांच्यासाठी काय केलंय. आम्हीच स्वबळावर सगळं मिळवलंय. अरे, आईवडिलांनी घास भरवला, शिक्षण दिलं, भावनिक गरज पुरवलीय आणि प्रेम दिलं म्हणूनच तर तुम्ही कमावते झालात, या गोष्टींचा विसर कसा पडतो यांना? मग फक्त संपत्तीच्या हावेपोटी न्यायालयात न्यायचं नाहीतर दुर्लक्ष करायचं.’ वृद्ध आई-वडिलांना सांभाळणे हे मुलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याचबरोबर ती कायदेशीर जबाबदारीही आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे.

–   मुले कमावती झाली की पालकांनी त्यांच्यात खूप भावनिक होऊन गुंतू नये. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला सांगून स्वतःचं घर घ्यायला सांगावं. एकत्र राहायचं असल्यास शेवटपर्यंत मुलांच्या नावे मालमत्ता न करता सन्मानाने जगावं.

– ‘जन्मऋण’मध्ये मनोज जोशी व सुकन्या मोने प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची संगीत दिग्दर्शक आहे वैशाली सामंत. येत्या 22 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.