
ओपन डेक पर्यटनासाठी एसी डबल डेकर बस घेण्याचा बेस्टचा प्रयत्न लांबवणीवर पडत असल्याने मुंबईकरही वेटिंगवर राहिले आहेत. ओपन डेक बससाठी बेस्टने तब्बल चार वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर 10 मे रोजी पुन्हा एकदा ओपन डेक व लोअर डेक वातानुपूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मुंबई दर्शन, हेरिटेज वास्तू पाहण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ओपन डेक बसेसची सुविधा उपलब्ध केली होती; परंतु बेस्टच्या ताफ्यात उपलब्ध ओपन डेक बसेसची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्या भंगारात काढण्यात आल्या. तर तीन ओपन डेक बसेस पालिकेला देण्यात आल्या असून या बसेसचे जतन करत रेस्टॉरंट, वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. परंतु मुंबईकर व पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या ओपन डेक बसेसचा प्रवास करता यावा यासाठी नव्याने 10 ओपन डेक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱया ओपन डेक बसेसमध्ये लोअर डेक वातानुपूलित असणार आहे. मात्र आतापर्यंत चार वेळा निविदा प्रक्रियेला बसेसचा पुरवठा करणाऱया पंपनीकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने पर्यटकांना ओपन डेकसह एसी डबल डेकर बसेसची पुढील वर्षभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.



























































