
महाराष्ट्र संपादक परिषदेकडून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया गुणवंत पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला जाणारा आदर्श पत्रकारिता सन्मान पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील दादर – माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात मोठय़ा दिमाखात पार पडला. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो. यावर्षी आदर्श पत्रकारिता सन्मान 2024 पुरस्कार झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी, वृत्त निवेदिका ज्ञानदा कदम, पत्रकार हेमंत जुवेकर, वैभव वझे, विनया देशपांडे, मराठवाडा साहित्य संमेलन 2023 चे माजी अध्यक्ष महेश माळवे, एकनाथ बिरवटकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रकाश पोहरे होते.























































