
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी रिक्षाचालकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित मुलगी बोरिवली परिसरात राहते. त्याच परिसरात अटक आरोपीदेखील राहतो. सोमवारी सायंकाळी मुलगी ही घरी एकटीच होती. तेव्हा घरात कोणी नसताना तो तिच्या घरात शिरला. त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्या कृत्याने पीडित मुलगी घाबरली. तिने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या आईने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.