
कासा-सायवन राज्य मार्गावर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी घडली. राहुल हारके (20), चिन्मय चौरे (19) आणि मुकेश वावरे (20) अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही ट्रिपल सीट प्रवास करत होते. तर या अपघातात कारमधील महिला रीना मोरे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राहुल, चिन्मय आणि मुकेश हे तिघेही आज संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीने ट्रिपल सीट कासा येथून सायवनच्या दिशेने निघाले. मात्र उधवा परिसरात अपघाती वळण आणि चढउतार असल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून कारसोबत जोडादार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, इको कार पलटी झाली. या कारमधील महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे.