
भाजपच्या राज्यात मनुवादी वृत्तीमुळे गरीब आणि मागासवर्गीयांचे हाल असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी मागल्या दोन दिवसात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, ओडिशा, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात वंचित विरोधी मानसिकतेतून गरीब आणि मागासवर्गीयांवर अत्याचार होत असल्याचं म्हटलं आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ”गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा अपमान केला आणि त्याच वंचित विरोधी मानसिकतेची पुनरावृत्ती भाजपशासित राज्यांमध्ये होत आहे.” गेल्या दोन दिवसात गरीब आणि मागासवर्गीयांचे कुठे आणि कसे हाल झाले, याची एक यादीच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केली आहे.
1. महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका आदिवासी गर्भवती महिलेला आयसीयूच्या शोधात 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आणि यातच तिचा मृत्यू झाला.
2. मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका दलित तरुणाची पोलीस कोठडीत हत्या.
3. ओडिशातील बालासोरमध्ये आदिवासी महिलांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.
4. हरियाणातील भिवानीमध्ये बीए परीक्षेची फी भरता न आल्याने दलित विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले.
5. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर 3 दलित कुटुंबांना पळून जाण्यास भाग पडलं, कारण त्यांना जाती-आधारित हल्ल्यांना सामोरे जावं लागलं आणि पोलिसही गप्प बसले होते.
मल्लिकार्जुन खरगे आहेत की, ”मोदी सरकारच्या घटनाविरोधी राजवटीत दलित, आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याक वर्गावर सातत्याने अत्याचार होत आहेत, हे सर्वांना माहित आहे. जे गरीब आणि वंचित आहेत त्यांना मनुवादाचा फटका बसत आहे. दलित-आदिवासी महिला आणि मुलांविरुद्ध दर तासाला एक गुन्हा केला जातो आणि एनसीआरबीनुसार हा आकडा 2014 पासून दुप्पट झाला आहे. काँग्रेस पक्ष 140 कोटी हिंदुस्थानींच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येऊ देणार नाही आणि भाजप-आरएसएसच्या घटनाविरोधी विचारसरणीला विरोध करत राहील.”
संसद में गृहमंत्री अमित शाह, बाबासाहेब डॉ अंबेडकर जी का अपमान करते हैं और भाजपा शासित राज्यों में वही वंचित-विरोधी मानसिकता दोहराई जा रही है !
पिछले दो दिनों में –
1. मध्यप्रदेश के देवास में दलित युवक की पुलिस कस्टडी में हत्या कर दी जाती है।
2. ओडिशा के बालासोर में आदिवासी…
— Mallikarjun Kharge (@kharge) December 31, 2024