शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार, अजित पवार गटाच्या झिरवळ यांच्या विधानाने रंगली चर्चा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवाळ यांना महायुती सरकारमध्ये पॅबिनेट मंत्रीपद मिळाले. आजच त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना झिरवाळ यांनी आजही शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठा अबाधित आहे असे सांगत आपण लोटांगण घालून त्यांच्या पाया पडणार आहोत, असे विधान केले. तसेच दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची खूप हेळसांड होतेय, काय करावे कळतच नाही, त्यामुळे दोन्ही पवारांनी एकत्र यावे अशी सर्वांचीच इच्छा आहे असा दावाही झिरवाळ यांनी केला.

नरहरी झिरवळ यांना अन्न व औषध प्रशासन खाते देण्यात आले असून आज त्यांनी त्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात आणि महाराष्ट्रात पवार कुटुंबाला एक वलय आहे. दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे अशी मी पांडुरंगाला विनंती करतो असे झिरवाळ म्हणाले. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील, पण अजितदादांसोबत गेलो. त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर मी गेलोच नाही. कोणत्या तोंडाने जाऊ. पण आता त्यांच्यासमोर जाऊन मी लोटांगण घालणार आहे, असे झिरवाळ म्हणाले.

पवार कुटुंबातील वाद मिटावेत! अजितदादांच्या आईंचे श्री विठ्ठलाला साकडे

पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून कुटुंब एकत्रित यावे व गुण्यागोविंदाने नांदावे. नववर्ष सर्वांना सुख-समृद्धीचे जाऊ दे, अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येऊ देत, असे साकडे आपण श्री विठ्ठलचरणी घातले आहे. पांडुरंग माझे गाऱहाणे नक्की ऐकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनानंतर व्यक्त केला.