
12 वर्षांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये मैदानावर उतरताना दिसते, मात्र ही गोष्ट थोडी खटकली. जर रोहित किंवा कोहली धावा करत असतील आणि हिंदुस्थान जिंकत असेल तर ते रणजी ट्रॉफीमध्ये खेळले असते का? त्यामुळे कामगिरी न पाहता व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला देत त्यांनी रणजी करंडक असो किंवा देशांतर्गत स्पर्धेत खेळणे हिंदुस्थानी संघातील सर्व खेळाडूंना बंधनकारक करायला हवे, असे संकेत दिले.