‘1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही’, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची टीका

”1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही”, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. कोकाटे यांनी पीकविमा योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असं ते म्हणाले होते. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे असं म्हणाले आहेत.

अंबादास दानवे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो, त्याला या सरकारमधील कृषीमंत्रीच भिकाऱ्यांची उपमा देत आहेत. 1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर राज्यचालतं, अशी टीका त्यांनी कोकाटे यांच्यावर केली आहे.

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य