राष्ट्रपती राजवटीला मैतेई समुदायाचा विरोध

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मैतेई समुदायाने आज निषेध नोंदवला. मोठ्या कालावधीपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप अशांतता आहे. एखाद्या सक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवायला हवे होते, असे मैतेई समुदायाने म्हटले आहे. दुसरीकडे, कुकी समुदायाने राष्ट्रपती राजवटीचे स्वागत करताना केंद्र सरकारच्या या निर्णयाला आशेचे किरण असे संबोधले. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने चार दिवसांनंतर गुरुवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली.